ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

थेरगावमध्ये केले घरच्या गायीचे डोहाळजेवण

पिंपरी, दि. १५ - गर्भवती महिलांचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण. साडी-चोळी, गोड-धोड खाऊ घालून साजरा करण्याचा दिवस. आपल्या मुलीसाठी सारेच आई-वडील हा कार्यक्रम करतात. पण, घरातच वाढणाऱ्या गायीसाठी हा पुढाकार घेतला जात नाही. हीच गोष्ट पिंपरी-चिंचवडमधील थेरगावमध्ये राहणारे नंदकुमार घारगे कुटुंबीयांना खटकली. त्यासाठी त्यांनी घरातील गायीचेही डोहाळजेवण करण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी मंडप घातला, वाद्य आणले, नागरीकांना आमंत्रण देऊन गोडधोड खाऊ घातले. एका मुलीप्रमाणे गायीचे डोहाळजेवण केले. 'गो-रक्षा बचाव'च्या नाऱ्याला बळ दिले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवकॉलनी मित्र मंडळाच्या वतीने शिव कॉलनी, गणेशनगर थेरगाव येथील शिवमंदीर प्रांगणात रविवारी (दि. १४) सायंकाळी करण्यात आले होते. डोहाळजेवणाच्या निमित्ताने गायीचे पूजन करून रात्री हभप माऊली महाराज कदम यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता. किर्तनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले.

पिंपरी येथील घारगे यांच्या घरात तीन वर्षांपूर्वी आळंदी येथून एक गाय आणली. आज तिचे वय तीन वर्ष महिने एवढे आहे. घारगे यांनी त्या गायीचे नाव 'गंगामाई' असे ठेवले. यंदा 'गंगामाई' गर्भवती राहिलीही गाय आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे. नव्हे ती आपली मुलगीच असल्याचा विचार घारगे यांनी कुटुंबातील इतर सदस्यांसमोर मांडला. त्यामुळे गंगामाईचे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिशय साध्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. पण, घारगे यांनी हा कार्यक्रम इतरांसाठी आदर्श ठरावा, असे सांगितले. सर्वांनी होकार भरल्यानंतर १४ मे ची तारीख निश्चित झाली. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम करण्यात आला. गंगामाईच्या पायात पैंजण, शिंगांवरती फुले, अंगावर साड्या अशा प्रकारे तिचा शृंगार करण्यात आला. २१ सुहासीनींनी तिला ओवाळून तिचे औक्षण केले. उपस्थितांच्या साक्षीने गंगामाईचे डोहाळजेवण करण्यात आले.

एकीकडे गाईंची हत्या होत असताना गाईचे डोहाळजेवण घालून एक सामाजिक संदेश दिला आहे. इथून पुढे गंगामाई जेव्हा जेव्हा गर्भवती राहील तेव्हा Posted On: 15 May 2017