ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टँकर लॉबीसाठीच दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय - श्रीरंग बारणे

पिंपरी, दि. १६ - पवना धरणामध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध असताना एक दिवसाआड पाणी देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय केवळ टँकर लॉबीला पाठीशी घालण्यासाठी घेतल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तसेच शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, तो दररोज एक वेळ पाणी पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.  खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर महापौर नितीन काळजे यांना पत्र पाठवून शहराला दररोज एक वेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. 

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बारणे पवना धरण भागात गेले असता त्यांना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसले. पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांकडे माहिती घेतली असता धरणात असलेला उर्वरित ३२% पाणी साठा ऑगस्टपर्यंत पुरेसा असून धरणामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा आहे, असे बारणे यांनी म्हटले आहे.

पवना धरणात पाणी साठा उपलब्ध असतानाही पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने दिला असल्याने दिवसाआड पाणी देण्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही. टँकरवाल्यांचे हित जोपासण्यासाठी जाणून बुजून दिवसाआड शहरातील नागरिकांना पाणी देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे, असा आरोप बारणे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती असून टँकरने पाणी पुरवठा करणारे वाटेल तसे टँकरचे दर लावत असल्याने सोसायटीमध्ये राहणा-या पाण्याची आवश्यकता असणा-या नागरिकांना नाहक पैसे मोजावे लागत आहे. यामध्ये टँकर माफियांचे भले होत असून सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक झळ पोहोचत आहे. नागरिकांना पाण्याच्या या त्रासापासून मुक्त करण्यासाठी दररोज एक वेळ अधिक दाबाने पाणी देण्यात यावे अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.