ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षण साहित्य वेळेत द्या - सुनिल गव्हाणे

पिंपरी, दि. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वंच विद्यार्थ्यांना पालिकेच्या माध्यमातून मोफत आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे भवितव्य सध्या प्रश्नांकीत आहे. दुसर्या बाजूला पालिकेची शिक्षण समिती देखील स्थापन झालेली नाही. या समितीचे स्वरूप, अधिकार यासंदर्भात देखील अजून कोणताही खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. महापालिका शाळांमध्ये सध्या ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्वच विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून मोफत शालेय साहित्य देण्यात यावे, असे गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सध्याच्या शिक्षण मंडळाचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. दुसर्या बाजूला पालिकेच्या उदासीनतेमुळे शिक्षण समिती स्थापन करण्याची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या गोंधळात  शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्पच मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे  शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार्या मोफत शालेय साहित्याचा प्रश्नच अधांतरी राहिला आहे. 

याबाबत पालिका आयुक्तांनी योग्य ती कारवाई करून तोडगा काढावा. कोणत्याही परिस्थितीत  विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाचे सर्वप्रकारचे साहित्य एकत्र एकाच दिवशी मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच वेळेत साहित्य भेटल्यास पालिका आवारातच शाळा भरवून प्रशानाचा निषेध करण्याचा इशाराही त्यांनी दिला  आहे. 

 शिष्टमंडळात कार्याध्यक्ष उमेश काटे, अक्षय शेडगे, विशाल परदेशी, विनायक जायभाये आदी सहभागी झाले होते.