ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वायसीएम रुग्णालयातील कुजलेल्या मृतदेहांना मिळणार नवी जागा

पिंपरी, दि. १८ - वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील अनोळखी आणि कुजलेल्या मृतदेहांना ठेवण्यात येणारी खोली व्हिसेरा ठेवण्यासाठी पोलिसांना देण्यात आली आहे. त्या खोलीचा ताबा पोलिसांकडे देण्यात आल्याने तुर्तास वायसीएम रुग्णालयात कुजलेले मृतदेह ठेवायचे कोठे हा प्रश्न  उभा होता. याबाबत वायसीएम प्रशासनाने पिंपरी महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी चर्चा केली असून त्यानुसार येत्या दीड महिन्यात वायसीएममध्ये कुजलेल्या मृतदेहांना स्वतंत्र जागा देणार असल्याची माहिती, वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीचा संशास्पद मृत्यू झाला तर, त्याचा उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा (मृत व्यक्तीच्या अवयवाचा भाग) राखून ठेवला जातो. संशायस्पद मृत्यू, विषारी औषध अथवा मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'व्हिसेरा' राखून ठेवण्यात येतो. व्हिसेरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणे गरजेचे असते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊन पोलिसांना आणि नातेवाईकांना न्याय मिळण्यास मदत होते. परंतु वायसीएम रुग्णालयात असलेला व्हिसेरा अनेक दिवसांपासून पडून असून ते पोलिसांनी अद्याप नेले नाही.

बहुतांश व्हिसेरा हे ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वी हे व्हिसेरा वासीएम रुग्णालयातील तातडीक विभागाजवळ ठेवण्यात आले होते. -याच दिवसांपासूनचे व्हिसेरा असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत होता. पोलिसांनी स्वतंत्र खोली देण्याची मागणी रुग्णालयास केली होती. अधीक्षकांच्या सूचनेनुसार शवविच्छेदन विभागातील खोली पोलिसांना व्हिसेरा ठेवण्यासाठी देण्यात आली.

ही जागा केवळ 'व्हिसेरा' ठेवण्यासाठी दिल्याने  शवविच्छेदनासाठी आलेला कुजलेला मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने डॉक्टर आणि पोलिसांमध्ये तक्रारीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यात तोंडावर पावसाळा आला आहे. पावसाळ्यात नद्यांमध्ये कुजलेले मृतदेह आढळून येतात. या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर हे मृतदेह ठेवण्यास रुग्णालयाकडे जागा नाही. तसेच मृतदेह घेऊन जाणास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने पावसाळ्यात डॉक्टर आणि पोलिसांमधील वाद वाढण्याची शक्यता आहेत्या पार्श्वभूमीवर ही वाढ