ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुद्रांक शुल्क वाढीबद्दल भाजपा सरकारचा जाहीर निषेध - मारुती भापकर

पिंपरी, दि. १९ - शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतर अर्थात (कन्व्हेअस डीडसाठी) मुद्रांक शुल्क चार टक्क्यांवरुन पाच टक्के तर ग्रामीण भागासाठी चार टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे  सर्व सामान्यांना मोठा फटका  बसणार आहे. तसेच या शुल्क वाढीसह पेट्रोलवरही सरकारने अधिभार लावला आहे.  त्यामुळे  सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी भाजपा सरकारचा जाहीर निषेध केला. 

भापकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत ना भय, ना भ्रष्टाचार याची  हमी देत महागाई कमी करून 'अच्छे दिन' आणण्याचा वादा पंतप्रधान नरेंद्र मोदी केला होता. त्यानंतर राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी विविध आश्वसनांची गाजरे दाखवून सत्ता संपादन केली. केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या काळात राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना,  शेतक-यांना अद्याप 'अच्छे दिन' काही आले नाहीत. 

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुदैवाने भाजपा सरकार आल्यापासून क्रुड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना वारंवार पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. आतापर्यंत पेट्रोलवर ११ रुपये अधिभार भाजपा सरकारने लावला आहे. कु्रड ऑईलचे एकुण मागील तीन वर्षात कमी झालेले दर पाहता हे पेट्रोल तीस रुपये प्रति लिटरने ग्राहकांना मिळायला हवे होते. परंतु, ते आज ७८ रुपये प्रति लिटरने सर्व सामान्य नागरिकांना मिळते. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर रुपयांनी कमी केले. राज्य सरकारने तत्काळ त्यावर २ रुपये अधिभार लावला. या दरवाढीमुळे सर्वच अत्यावश्यक वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

त्याचप्रमाणे रक्ताच्या नात्यातील बक्षिसपत्राने मालमत्ता हस्तांतरित करण्याचे शुल्क दोन टक्क्यांवरुन तीन टक्के करण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. हा निर्णय सर्व सामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे, असे भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

केंद्रातील राज्यातील भाजपा सरकारने सर्व सामान्य नागरिकांचा, शेतक-यांचा, कामगारांचा विश्वासघात केला असून अशा प्रकारचे कर वाढवून सर्व सामान्य नागरिकांचे Posted On: 19 May 2017