ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रधानमंत्री आवास योजनेची परस्पर अंमलबजावणी कशी, महापौरांचा महासभेत त्रागा

पिंपरी, दि. २० - प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांना माहिती देणे गरजेचे होते. या योजनेची प्रशासनाने  परस्पर अंमलबजावणी कशी सुरू केली, असा संतप्त सवाल महापौर नितीन काळजे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच या योजनेची माहिती सर्व नगरसेवकांना देण्याचे आदेश महापौर काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत घरांचे मागणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. पालिकेकडून नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु, याबद्दल महापौर नितीन काळजे यांना कसलीच माहिती प्रशासनाने दिली नाही. हा निर्णय प्रशासनाने परस्पर घेतला असल्याचे, महापौर काळजे म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रसिद्धीपत्रक काढून अर्ज करण्याचे आवाहन, नागरिकांना केले होते. तसेच अर्ज दाखल करण्यासाठी  केवळ आधारकार्डच देण्याचे त्यांनी सांगितले होते. प्रधानमंत्री आवास योजना महापालिका राबविणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याचे आवाहन खरेतर महापौरांनी करणे गरजेचे होते. परंतु, या योजनेची अधिका-यांनी महापौरांना कसलीच माहिती दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. विशेष म्हणजे प्रकल्प पहिल्या टप्यात महापौरांच्याच प्रभागात राबविण्यात येणार आहे. 

कोणतेही निर्णय घेताना पदाधिका-यांना विचारात घेतले पाहिजे. या योजनेबाबत नागरिकांकडून नगरसेवकांना विचारले जात आहे. मात्र, बहुतांश नगरसेवकांना या योजनेची माहितीच नाही. त्यामुळे नगरसेवक त्रस्त आहेत. वर्तमानपत्रातून बातम्या वाचायला मिळत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसह, केंद्र सरकारच्या सर्व  योजनांची माहिती सर्वपक्षीय नगरसेवकांना देण्याचे आदेश, महापौर नितन काळजे यांनी आयुक्त हर्डीकर यांना  दिले आहेत.