ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काळेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाची धडक कारवाई

पिंपरी, दि. २० - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने आज (शनिवारी) सकाळी काळेवाडी, रहाटणी परिसरातील रिंग रोडवरील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे. 

प्राधिकरणाने रस्ते मोकळे करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्याअंतर्गत ही कारवाई सुरु आहे. काळेवाडी, रहाटणी परिसरात प्राधिकरणाच्या रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहेत. त्यामध्ये रहिवाशी घरे, शाळा, दुकाने, गोडावून आहेत. 

रहाटणी येथील सर्व्हे नंबर २५ फेज येथून शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्तात रिंग रोडवरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली असल्याचे, प्राधिकरणाचे उपअभियंता वंसत नाईक यांनी सांगितले. 

तीन पोकलेन, दोन जेसीबी, प्राधिकरणाचे पोलीस, वाकड ठाण्याचे पोलीस यांच्या सहकार्याने ही कारवाई सुरु आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश खडके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता वंसत नाईक यांचे पथक ही कारवाई करत आहे