ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नगरसेविकांच्या अहो आणि मुलांमुळे पालिका अधिकारी त्रस्त

पिंपरी, दि. २१ - स्थानिक स्वराज्य संस्थात स्त्री-पुरुष समानतेसाठी महिलांना आरक्षण मिळून दोन दशके लोटल्यानंतर आजही नगरसेविकांऐवजी त्यांचे पती आणि मुलेच अधिक सक्रिय असल्याचे चित्र आहे. पिंपरी महापालिकेतील अनेक नवनिर्वाचित नगरसेविकांते पती आणि मुले आपणच कारभारी असल्याच्या थाटात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालिकेतील अधिकारी हैराण झाले आहेत 

महिलांना आरक्षण देण्यामागील समानतेच्या हेतूला हरताळ फासून बहुतेक नगरसेविकांचे पती आणि मुले आपण स्वत: नगरसेवक असल्याच्या थाटात महापालिकेत वावरत आहेत. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. अनेक नगरसेवक, नगरसेविका प्रथमच निवडून आल्या आहेत. काही नगरसेविकेचे पती आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात कामात हस्तक्षेप आहे. नगरसेविकेचे पतीच विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देताना दिसत आहेत 

आई, पत्नी नगरसेवक असल्याचा फायदा उठवित काही मंडळी थेट अधिका-यांच्या कक्षात जाऊन अरेरावी करीत असल्याची तक्रार केली जात आहे. काही नगरसेविकांच्या कुटुंबातील व्यक्तीच बैठक घेऊन जाब विचारत आहेत, अशा वेळी काय करावे, असा प्रश्न  अधिका-यांना पडत आहे 

प्रभागात कोणती कामे होणार, काही कामांना प्राध्यान्य द्या, असे वेगवेळया सूचना वजा सल्ले दररोज अधिका-यांना मिळत आहे. पालिकेच्या कामाची माहिती नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना माहिती करुन देण्यासाठी येत असतील असे वाटत होते. लवकरच हा प्रकार बंद होईल अशी, शक्यता वर्तविली जात होती. परंतु, महिला सभांसदाऐवजी त्यांचे पती, मुले सतत कार्यालयमध्ये येऊन जाब विचारत असल्याने कोणाकडे दाद, मागायची, असा प्रश्न अधिका-यांना पडला आहे.