ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

रस्त्त्यासाठी बोपखेलच्या ग्रामस्थांचे पिंपरीत उपोषण

पिंपरी, दि. २२ - हक्काचा रस्ता मिळावा या मागणीसाठी बोपखेल येथील ग्रामस्थ रविवारी (दि.२१) पासून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले आहेतबोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला आहे. हा रस्ता बंद केल्यामुळे बोपखेलच्या नागरिकांचे हाल होत आहे. त्यांना पिंपरीत येण्यासाठी लांबून वळसा घालून यावे लागत आहे. हा रस्ता पुन्हा सुरु करावा, या मागणीसाठी बोपखेलच्या ग्रामस्थांनी मोठे आंदोलनही केले होते 

बोपखेलमधील नागरिक, विद्यार्थी, महिला कामगारांना दळणवळणासाठी मुळा नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पूल उभारण्यात आला होता. मात्र तो गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यानमुळा नदीवर तात्पुरता पुल बांधण्याच्या आणि रस्त्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यात यावा या मागणीसाठी बोपखेलचे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत