ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लग्नातल्या आईस्क्रिममधून ५६ जणांना विषबाधा

पिंपरी, दि. २३ - पिंपरी चिंचवडमध्ये लग्नातील आईस्क्रिममधून ५६ वऱ्हाडींना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रहाटणीतल्या थोपटे लॉन्समध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. संध्याकाळी लग्नात आईस्क्रिम खाल्ल्यानंतर लहान मुलांना उलट्या होऊ लागल्या. उन्हामुळे हा त्रास झाला असावा असा अंदाज, सुरुवातीला वर्तवण्यात आला. मात्र काही वेळातच मोठ्यांनाही उलट्यांचा त्रास झाल्यानं सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

एकूण ५६ जणांना विषबाधा झाली असून औंध जिल्हा रुग्णालय तसंच वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्यांपैकी अकरा महिन्याच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वाकड पोलिसांनी केटरर्सच्या मालकासह आईस्क्रिम पार्लरवाल्याला ताब्यात घेतलं आहे.