ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएमआरडीतर्फे इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प राबवावा - महापौर काळजे

पिंपरी, दि. २३ - इंद्रायणी नदीचे देहू ते आळंदी पात्र पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या हद्दीत येते. त्यामुळे पीएमआरडीएने प्राधान्याने देहू ते आळंदीपर्यंतचा इंद्रायणी नदीचा भाग विकसित करण्याचा प्रकल्प तातडीने राबविण्याची मागणी महापौर नितीन काळजे यांनी पीएमआरडीएकडे केली आहे.

याबाबत महापौर काळजे यांनी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीस लागून इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आळंदी ही महाराष्ट्रातील मुख्य तिर्थक्षेत्र आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून वारकरी भाविक येत असतात.

देहू ते आळंदी हे पात्र पीएमआरडीएच्या हद्दीत येते. पीएमआरडीएमार्फत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएने प्राधान्याने देहू ते आळंदीपर्यंतचा नदीचा भाव विकसित करण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात यावा, असे महापौर काळजे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणा-या पात्रासाठी आवश्यक खर्च महापालिकेमार्फत देण्यासाठी किंवा कंपन्या, बांधकाम व्यावसायिक आदींच्या सीएसआर फंडातून घेण्याबाबत कार्यवाही करता येऊ शकेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.