ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिका आयुक्तांच्या कामगिरीचे होणार मूल्यमापन, आयुक्तांसाठी केआरए

पिंपरी, दि. २४ - राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता केआरए निश्चित केला आहे. त्यासाठी १०० गुण दिले असून या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.

शहर विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे व्हाव्यात, यासाठी राज्यातील महापालिका आयुक्तांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालिकेतील प्रमुख खात्यांच्या कामकाजावर अधिक भर देण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मिळकतकर आणि इतर करांची ९० टक्यांपेक्षा अधिक वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

खासगी कंपन्यांमध्ये 'केआरए'च्या माध्यमातून कर्मचा-यांचे काम मोजले जाते. बढत्या, पगारवाढ यासाठी 'केआरए'चे निकष वापरले जातात. तीच पद्धत आता शासनस्तरावर राबविली जाणार आहे. नागरी भागांसाठी केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजना असतात. 'स्मार्ट सिटी', अमृत या सारख्या योजनांमधून शहरांकडे मोठा निधी वळविला जात आहे. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी आता महापालिका आयुक्तांच्या कामगिरीचे मोजमाप होणार आहे. 

केआरएमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर सर्वाधिक ३० गुण देण्यात आले आहेत. कर वसुलीसाठी २०, स्वउत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी २०, पायाभूत प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी १०, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १० तर, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी इतर प्रशासकीय बाबींसाठी 10 गुण दिले जाणार आहेत. यामुळे पालिका आयुक्तांनाही आपला 'परफॉर्मन्स' दाखवावा लागणार आहे. 

प्रत्येक निकषासाठी गुण असून १०० पैकी जास्तीत-जास्त गुण मिळविणे हे प्रत्येक आयुक्तांपुढे आव्हान असणार आहे. या गुणांकनाची नोंद आयुक्तांची वार्षिक कामगिरी ठरविण्यासाठी होणार असून गोपनीय सेवापुस्तकांतही या गुणांची नोंद घेतली जाणार आहे.