ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नगरसेवकांच्या प्रश्नांवर अधिका-यांची भंबेरी, नगरसेवकांची नगण्य उपस्थिती

पिंपरी, दि. २४ - स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराची क्रमवारी का घसरली, याला जबाबदार कोण,  शहरातील कचरा नियमितपणे का उचलला जात नाही. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा का केला जात नाही, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती नगरसेवकांनी केली. निमित्त होते नगरसेवकांच्या कार्यशाळेचे. या कार्यशाळेला १३३ नगरसेवकांपैकी केवळ ५१ नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविली. सर्वपक्षीय नगरसेवकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी महापौर नितीन काळजे यांनी कार्यशाळा घेण्याचे आदेश अधिका-यांना दिले होते.

त्यानुसार आज (बुधवारी) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात नगरसेवकांची कार्यशाळा पार पडली. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सह आयुक्त दिलीप गावडे यांनी माहिती दिली. स्वच्छतेबाबत पालिका राबवित असलेल्या सर्व योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर नगरसेवकांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी प्रभागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याची तक्रार केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी गांधीनगर येथील समस्यांकडे अधिका-यांचे लक्ष वेधले. नीता पाडाळे यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा-वेगळा केला जात नसल्याची तक्रार केली. 

पालिकेने वाटलेल्या डस्टबीनमध्ये कचरा बसत नाही. पालिका पुन्हा डस्टबीनचे वाटप करणार आहे का? प्रभागातील रस्ते का साफ केले जात नाहीत, अशा विविध प्रश्नांच्या फैरी नगरसेवकांनी झाडल्या. नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिका-यांची भंबेरी उडाली.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोणाला घरे मिळणार आहेत? ती घरे मोफत मिळणार आहेत का नागरिकांना किती पैसे भरावे लागणार आहेत. अर्जासोबत कोणती कागदपत्रे द्यावयाची आहेत. घरकुल योजनेत ज्यांना घरे मिळाली नाहीत, अशा नागरिकांनी या योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचे आहेत का? असे विविध प्रश्न नगरसेवकांनी अधिका-यांना विचारले. प्रधानमंत्री आवास योजनेची नगरसेवकांना माहिती देताना सह आयुक्त योगेश कडूसकर यांना मात्र घाम फुटला होता.