ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता

पिंपरी, दि. २५ - मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मी त्यात नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे”, अशी सुसाईड नोट लिहून एक तरुणी घरातून बेपत्ता झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील जुन्या सांगवीत ही घटना घडली आहे. शिवानी राजपूत (वय १९ वर्ष) असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगमनगर इथल्या राहत्या घरातून निघून गेली.

काल (२४ मे) बारावीचा निकाल लागणार आहे, अशी अफवा पसरल्याने शिवानी राजपूतने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तरुणी हरवल्याची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.