ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रस्ता पीडब्ल्युडीचा असताना बड्या प्रकल्पांसाठी करोडांचा खर्च कशासाठी - बाबा धुमाळ

पिंपरी, दि. २५ - निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते दापोडीपर्यंत पुणे - मुंबई महामार्गाची हद्द सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्युडी) मालकीचा असताना महापालिकेने सन २००४ पासून या रस्त्यावर ग्रेडसेपरेटर, बीआरटीएस अशा प्रकल्पांसाठी करोडो रूपयांचा खर्च कशासाठी केला, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांनी केला आहे. 

यासंदर्भात बाबासाहेब धुमाळ यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील एखाद्या वॉर्डात कोणाच्या जागेत पेव्हींग ब्लॉक किंवा छोटासा रस्ता करायचा झाल्यास त्या जागा मालकाकडून अधिकार पत्र, हक्कपत्र लिहून घेतले जाते. त्यानंतरच काम केले जाते. मात्र, निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते दापोडीपर्यंत पुणे - मुंबई महामार्गाची हद्द सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्युडी) मालकी हक्काची आहे. असे असताना महापालिकेने पीडब्ल्युडीच्या एका साध्या पत्रावर या महामार्गावर कोट्यावधीचा खर्च करून विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या पैशांची धुळधाण केली आहे. 

रस्ता मालकीचा नसाताना सन २००४ पासून या रस्त्यावर ग्रेडसेपरेटर, बीआरटीएस या प्रकल्पांवर करोडांचा खर्च कशासाठी केला. या रस्त्याबाबत पीडब्ल्युडी, राज्य किंवा केंद्र सरकारकडे रस्त्याचा हक्क मिळण्यासाठी मागणी केली आहे का, असल्यास त्या पत्राची प्रत मिळणे आवश्यक आहे. केवळ पीडब्ल्युडीने पत्राद्वारे दिलेल्या परवानगीने महापालिकेने सन २००० पासून किती आणि कसा खर्च केला आहे, याची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती द्यावी. तसेच भक्ती - शक्ती चौकात करण्यात येणारा रिंगरोड आणि ९० कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाचे काम त्वरीत थांबवण्यात यावे. 

या प्रकल्पासाठी जागेचा ताबा मिळाला असल्यास किंवा राज्य सरकारसमवेत करारनामा केला असल्यास त्याचीही माहिती मिळावी. अन्यथा, बेजबाबदार कामाविरूद्ध आणि नागरिकांच्या पैशांच्या लुटमारीविरोधात जनआंदोलन पुकारण्यात येईल. प्रसंगी न्यायालयातही धाव घेण्यात येईल, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.