ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जो तो आपल्या कर्तृत्वान मोठा होतो- सदाभाऊ खोत

पिंपरी, दि. २६ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेकडे पाठ फिरवणाऱ्या सदाभाऊ खोता यांनी पिंपरी-चिंचवडमधील सांगवीतल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी यशवंतराव चव्हाणांच्या वक्तव्याचा आधार घेत पुन्हा एकदा राजू शेट्टींना टोला लगावला आहे

राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत नाही. जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होत असतो, असा टोला सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे

मी पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे.’ असंही यावेळी ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शिवारावरील संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचं ही सदाभाऊंनी सांगितलं.