ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात

पिंपरी, दि. २६ -  पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि.२५) पासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार आहे. यामुळे  याठिकाणी २५० मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे.

पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचा मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणा-या वृक्षांना जीवदान मिळाले आहे. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. महामेट्रोने पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचे १०.७५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रोमार्गावर नऊ स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्याने सर्व स्टेशन्स वरच्या बाजूला राहणार आहेत. मेट्रोला स्टेशन्ससाठी जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यासंदर्भात महा मेट्रोच्या व्यवस्थपकांनी महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे.

ग्रेड सेपरेटरच्या बाजूला असणा-या बीआरटी मार्गावर करण्यात आलेल्या थांब्याचा वापर मेट्रो स्टेशनसाठी होऊ शकतो. मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. महामेट्रोकडून काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असली तरी नाशिक फाटा चौकामधील वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सकाळीच या ठिकाणी अपघात झाला आहे.