ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्राधिकरणाच्या वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे - विजय पाटील

पिंपरी, दि. २६ - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या वतीने चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प सुरु केला आहे. या गृहप्रकल्पाचे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. तसेच गृह प्रकल्पाचे काम अंत्यत संथ गतीने सुरु असल्याचेही ते म्हणाले. 

प्राधिकरणाच्या वतीने  चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील सेक्टर क्रमांक ३०/३२ येथे गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. प्रकल्पाच्या पायाभरणीचे 'क्युरिंग' व्यवस्थित झालेले नाही. सिमेंटच्या बांधकामास पाणी अपुरे मिळाल्यामुळे सदरच्या बांधकामास धोका संभवत आहे.  पाणी कमी दिल्यामुळे भिंतींना भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. इमारत पाया मजबुती करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बांधकामास वापरण्यात येणा-या खडीमध्ये मोठ्या प्रमाणात माती देखील आढळून आली असल्याचे, पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

प्रकल्पाची मुदत ४२ महिने असून प्रकल्प दोन टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. २०१४ मध्येच या प्रकल्पाचे काम चालू होणे अपेक्षित होते. परंतु, राजकीय आणि कागदी घोडे तसेच लाल फितिचा कारभार यामुळे प्रकल्प सुरू होण्यास २०१६ उजाडले आहे. असे असतानाही आजही प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरु आहे. पंधरा-पंधरा दिवस काम बंद असते. याच पद्धतीने कामकाज चालले तर २०२० पर्यंत प्रकल्पाचे काम पुर्ण होणार नाही.

बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक कमी आहेत. तसेच सुरक्षा भिंत देखील नाही. यामुळे प्रकल्प परिसर तळीरामांचा अड्डा झाला आहे. हे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिकेस  सरासरी लाखापेक्षा जास्त रक्कम प्राधिकरण प्रशासनाने मंजूर केलेली आहे. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरुन हा  गृहप्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.