ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माउलींच्या पालखी रथाला बैलजोडी कुणाची, वाद न्यायालयात

आळंदी, दि. २६ - संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वरांच्या पालखी रथासाठी चिताळकर पाटील की कु-हाडे पाटील यांच्यापैकी कोणाची बैलजोडी जुंपण्यात येणार आहे, असा प्रश्न समस्त आळंदीकरांच्या डोक्यावर गरूड करून बसला आहे. ज्यांना सेवेची संधी मिळालेली नाही अशांना संधी मिळावी असे एक मत आहे तर बैलजोडी निवड समिती सांगेल त्यांची बैलजोडी जुंपावी अशी दोन्ही मते पुणे उपजिल्हा न्यायालयात आली आहेत. जून रोजी न्यायालयाची सुनावणी होणार असल्याने आळंदीकर न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

आळंदी देवस्थान येथील बैलजोडी समितीने २०१७ च्या पालखी सोहळ्यात राहुल चिताळकर पाटील यांची बैलजोडी पालखी रथ ओढणार याबाबत शिक्कामोर्तब करून झालेल्या ठरावाचे पत्र चिताळकर पाटील यांना दिले आणि नावे देवस्थान समितीकडे पाठविली होती. परंतु यावर्षी समितीने आपल्या निर्णयात फेरबदल केले. त्यानुसार कु-हाडे परिवारासह अन्य १३ जणांचे रीतसर अर्ज दाखल झाले. यामध्ये यापूर्वी पालखी रथाची सेवा केलेल्या परिवाराची देखील नावे आली. आपल्याच लोकांना यंदाचा मान मिळावा. यासाठी बैलजोडी समितीतील कु-हाडे यांनी निलेश कु-हाडे पांडुरंग कु-हाडे यांच्या बैलांसाठी देवस्थान समितीकडे नावे सादर केली. त्यामळे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी पुणे उपजिल्हा न्यायालयात दावा दाखल केला.

यापूर्वी पालखी रथाच्या बैलजोडीसाठी एकच नाव सुचविले जात असे, परंतु यंदा दोन नावे सुचविण्यात आली आहेत. यामुळे आतापर्यंत एकच बैलजोडी जुंपण्याची प्रथा होती, ती आता दोन बैलजोड्या जुंपून प्रथा मोडली जाणार का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बैलजोडी निवडीचे प्रकरण न्यायालयात असल्याने देवस्थान समितीने अंतिम निर्णय दिला नसल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

बैलजोडी निवड समितीने यंदा अचानक निवडलेल्या कु-हाडे पाटील परिवाराने पुण्यातील बाबुराव विधाते यांची बैलजोडी विकत घेऊन बैलजोडीचे आळंदीत जंगी स्वागत केले. बैलजोडीच्या आळंदीतील आगमनावेळी मिरवणूक काढून माउलींच्या मंदिरात महिलांनी त्यांची पूजा केली. समितीच्या निर्णयाप्रमाणे बैलजोडी आळंदीत दाखल तर झाली पण न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वच कान टवकारून आहेत.