ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर नावे टाकण्यावरून राजकारण

पिंपरी , दि. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर नावे टाकण्यावरून सत्ताधारी भाजप राजकारण करत असल्याचा, आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या  खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकल्याने राष्ट्रवादीने तीव्र शद्बात नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भुमीपूजन कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका छापण्यात येते. त्या पत्रिकेवर उद्घाटक नेत्याचे नाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष, खासदार, आमदार, पालिकेतील पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांची नावे छापली जातात. निमंत्रण पत्रिकेवर नावे टाकण्यावरून नेहमीच कुरबुरी सुरू होत असतात.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ मधील सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपुलाचे भुयारी मार्गाचे लोकार्पण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण आणि अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाची निमंत्रण पत्रिका छापली आहे. सत्ताधारी भाजपने निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख अतिथींची नावे टाकण्याची नवीनच प्रथा सुरू केली आहे. भाजपकडून प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण पत्रिकेवर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची नावे टाकली आहेत.  

खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे यांची नावे प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिकेवर अगोदर टाकणे गरजेचे असते. त्यांच्या अगोदर आपल्या नेत्यांची नावे टाकण्यात यावी, यासाठी भाजपने प्रमुख अतिथीची नवीन पद्धत सुरू केली असल्याची, पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ताथवडे हा भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत जोडला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात हा परिसर येतो. बारामती लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेत करत आहेत. महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर यापूर्वी सुळे यांचे नाव टाकले जात होते. परंतु, पालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा हा पहिल्याच कार्यक्रम असून पहिल्याच कार्यक्रमात सुळे यांचे नाव Posted On: 27 May 2017