ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. २९ - एमसीएसाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी नंदकुमार सातुर्डेकर यांनी रविवारी (दि. २८) शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास शिक्षणमंत्री तावडे निगडीत आले होते. त्यावेळी सातुर्डेकर यांनी पालकांच्या वतीने त्यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर उपस्थित होते. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलेल्या निवेदनात सातुर्डेकर यांनी म्हटले आहे की, सध्याचे युग हे संगणकाचे युग असल्याने बीसीए, एमसीए आदी कोर्सेसकडे विद्यार्थी पालकांचा ओढा आहे. मात्र, बीसीए झाल्यानंतर एमसीएला प्रवेशासाठी मागील वर्षांपासून सीईटी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बीसीए परीक्षेनंतर नोकरी शोधावी की एमसीएला प्रवेश घ्यायचा याबाबत विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. त्यांना संबधित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये याबाबत योग्य ते मार्गदर्शनही मिळत नाही. 

एमसीएला प्रवेश घ्यावा असे त्यांना वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यांचे वर्ष वाया जाते. एकतर प्लेसमेंट शोधणे अथवा वर्षभरासाठीचा एखादा कोर्स करणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर शिल्लक राहतो. त्यामुळे सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणे आवश्यक आहे, असे सातुर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. 

गतवर्षीही सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुणे विद्यापीठाने ती अमान्य केली. यावर्षीही एमसीए अभ्यासक्रमास प्रवेशासाठी १८ मार्चला सीईटी परीक्षा घेण्यात आली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.