ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बारावीमध्ये मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून येथे पित्याची गळफास घेवून आत्महत्या

पिंपरी, दि. ३१ -  बारावीच्या परिक्षेत मुलाला कमी गुण मिळाले या कारणावरुन पित्याने राहत्या घरी गळपास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी गाव येथे घडली आहे. विश्वंबरम माधवन पिल्ले (वय.४८ रा. सुकवानी कस्टल, पिंपरीगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले यांचा मुलगा विज्ञान शाखेमध्ये  शिकत होता. आज बारावीचा निकाल होता. त्यामुळे घरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. त्यात मुलाला ७१ टक्के गुण मिळाले. हे विश्वंबरम यांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण होते. त्यामुळे त्यांनी घरातील बाथरुममध्ये जाऊन शॉवरला ओढणीने गळफास घेतला, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.

विश्वंबरमयांचे भोसरीतील लांडेवाडी येथे नुटक इंजिनीयरींग यानावाचे वर्कशॉप आहे. त्यांना मुलाने बारावीमध्ये चांगले गुण घेणे अपेक्षीत होते मात्र तसे झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.याबाबत पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बारावीच्या निकालाच्या धास्तीने सांगवीतील एक मुलगी आत्महत्या करण्यास गेली होती तर एका पित्याने मुलाचे गुण कमी मिळाले म्हणून आत्महत्या केली आहे. दोन्ही घटना या विचार करायला लावणा-या आहेत. यामध्ये बारावीचा निकाल हा जिवापेक्षा मोठा असतो का याचा  विचार पालक त्यांच्या पाल्यांनीही करायला हवा.....कारण परिक्षेची संधी मिळते जगण्याची नाही.