ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… तोवर पीएमपीएलला पैसे देणार नाही, स्थायी समिती निर्णयावर ठाम

पिंपरी, दि. १ - पिंपरी-चिंचवड महापालिका श्रेत्रात पीएमपीएमएलच्या १४८ बस धावतात. त्यापैकी २४ बस गाड्या एकादिवशी बंद पडल्या होत्या. त्याचे उत्पन्न बुडाले आहे. याबाबतची माहिती मागविली असता पीएमपीएमएल व्यवस्थापन ती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा, आरोप स्थायी सदस्यांनी केला. तसेच लोकप्रतिनीधींच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे जोवर पिंपरी महापालिकेत येत नाहीत, तोवर पीएमपीएला छदामही देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची काल (बुधवारी) साप्ताहिक सभा पार पडली. विषयपत्रिकेवक पीएमपीला पैसे देण्याचा विषय होता. 

पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएलचे अनेक मार्ग बदलले आहेत. ते सुरळीत झाले पाहिजेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. पीएमपी बाबत अनेक नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. पीएमपीएलच्या अधिका-यांनी आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत, असे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या. तसेच त्यांचे विषय थांबविल्यामुळे तरी समस्या ऐकूण घेण्यासाठी पीएमपीचे अधिकारी पिंपरी पालिकेत येतील असेही त्या म्हणाल्या. 

स्थायी समितीच्या बैठकीला दरवेळी नवीन अधिकारी येतात. स्थायी समितीच्या बैठकीला सक्षम अधिकारी आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेला स्वत: पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी हजर राहणे गरजेचे आहे. याबाबत आपण मुंडे यांना तसे पत्र दिल्याचेही, सावळे यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्तही पत्र देणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

महापालिका पीएमपीएमएला पैसे देते. पैसे देण्यास महापालिकेचा कसलाच विरोध नाही. पंरतु, आमच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष मुंडे यांनी महापालिकेत आले पाहिजे. आमच्या अडी-अडचणी, तक्रारी ऐकूण घेतल्या पाहिजेत. त्यामुळे जोपर्यंत तुकाराम मुंडे पालिकेत येत नाहीत, तोपर्यंत पालिका पीएमपीएलला पैसे देणार नसल्याचे, सावळे यांनी स्पष्ट केले.