ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्पाईन रोडवरील ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी प्राधिकरणाकडून खर्च घ्या - भाऊसाहेब भोईर

पिंपरी, दि. १ - निगडी येथील भक्ती शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये स्पाईन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. हा रस्ता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी प्राधिकरणाकडून खर्च घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
याबाबत भोईर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, स्पाईन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. हा रस्ता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतून जात आहेपिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण बाधित घरांना महापालिकेतर्फे  आधीच सुखसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचाही अतिरिक्त खर्च महापालिकेवर पडत आहे.
आता नवीन होणा-या उड्डाणपूल ग्रेड सेपरेटरचाही खर्च राज्य शासनाच्या ताब्यातील रस्त्यावर महापालिकाच करणार आहेपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतून जाणा-या ग्रेड सेपरेटरचा खर्च केवळ महापालिकेने करता पालिका पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांनी संयुक्तरित्या करावा. त्यामुळे महापालिकेवरील खर्चाचा बोजा कमी होईल, अशी मागणी भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे
.