ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजप विरोधकांची पिंपरीत निदर्शने, शेतकरी संपास जाहीर पाठिंबा

पिंपरी, दि. ३ - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसेसह विविध संघटनांनी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि.) पासून पुकारलेल्या संपास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवारी) पिंपरी चौकात भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर कविचंद भाट, शिवसेनेचे विनायक रणसुभे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, सुदाम ढोरे, नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फजल शेख, संघटक विजय लोखंडे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, आनंदा यादव, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, मानव कांबळे आदी उपस्थित होते. 

भाजप शेतक-यांच्या संपामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पंरतु, संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी संपावर ठाम आहे. खोटे-बोलपण रेटून बोल ही भाजपची पद्धत आहे, असे सांगत संजोग वाघेरे म्हणाले, शेतकरी राजा संकटात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने शेतक-यांचे कर्ज माफ करु, शेतीमालाला हमीभाव देवू, स्वामीनाथान आयोगाची अंमलबजावणी करु अशी विविध आश्वासने दिली होती. त्यांच्या या भूलथापांना बळी पडून जनतेने त्यांना निवडून दिले. मात्र, केंद्रातील सरकारला तीन वर्ष आणि राज्यातील सरकारला अडीच वर्ष पुर्ण झाले. तरीही, शेतक-यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असे वाघेरे म्हणाले. 

उत्तरप्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर भाजप सरकारने एका महिन्याचा आत कर्जमाफी केली. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमध्ये अडीच वर्ष झाले. तरीही अभ्यासच करत आहे. जोपर्यंत शेतक-यांचे कर्ज माफ होत नाही, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा, इशाराही वाघेरे यांनी दिला आहे.