ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच जिरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे - महापौर काळजे

पिंपरी, दि. ५ - कच-याची समस्या गंभीर होवू नये यासाठी कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच जिरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. तसेच कचरा विलगीकरणाच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही, त्यांनी यावेळी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत रोजलँड हौसिंग सोसायटी, पिंपळे सौदागर येथे ओला, सुका घरगुती घातक कचरा विलगीकरण मोहिमेचा शुभारंभ आज (सोमवारी) महापौर काळजे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्वच्छ भारत अभियान ब्रँन्ड अॅबेसिडर अंजली भागवत (आंतरराष्ट्रीय नेमबाज), विधीसमिती सभापती शारदा सोनवणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल विठ्ठल उर्फ नाना काटे, सह आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते. 

महापौर काळजे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याची समस्या दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. जिथे कचरा निर्माण होते, तिथेच जिरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांनी ओला, सुका आणि घरघुती घातक कचरा वेगळा करुन देणे गरजेचे आहे. कचरा विलगीकरणाची मोहीम सहा महिने सुरु राहणार आहे. ओला आणि सुका कचरा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 

नागरिकांनी ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा वेगवेगळा करण्यासाठी प्लास्टिक बकेटचा वापर करावा. पिंपरी-चिंचवडकरांनी ओला सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीमध्ये टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही महापौर काळजे यांनी केले.

दरम्यान, ओला, सुका घरगुती घातक कचरा विलगीकरण मोहिमेचा प्रारंभ सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत Posted On: 05 June 2017