ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हज यात्रेकरूंची सेवा करण्याची पिंपरी महापालिकेतील मुस्लिम कर्मचा-यांना संधी

पिंपरी, दि. ६ - रमझान महिन्यात सौदी अरेबिया येथे हजला जाणा-या यात्रेकरूंची सेवा करण्याची संधी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुस्लिम कर्मचारी बांधवांना मिळणार आहे. या यात्रेत सेवा बजाविण्यासाठी राज्य शासनातर्फे खादीम-उल-हुज्जाज पाठविण्यात येणार आहेत. ही खिदमत करण्यासाठी येत्या बुधवार (दि. ) पर्यंत अर्ज करणे आवश्यक असून महापालिकेतील इच्छूक मुस्लिमांनी अर्ज करण्याचे आवाहन, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

सौदी अरेबिया येथील मक्का आणि मदिना या मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणा-या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदूस्थानातून लाखो मुस्लिम बांधव दरवर्षी हज यात्रेकरू म्हणून जात असतात. हज २०१७ च्या यात्रेकरूंची 'खिदमत' करण्याची संधी 'खादीम-उल-हुज्जाज' म्हणून जाणा-या शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुस्लिम कर्मचा-यांना मिळणार आहे.

सुमारे दोनशे यात्रेकरूंच्यामागे एका 'खादीम-उल-हुज्जाज'ची निवड करण्यात येते. राज्य शासनातर्फे पाठविण्यात येणा-या या खिदमतगारांची निवड महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये क्लास वन अधिकारी, तसेच त्या पदावरील अधिका-यांना वगळून सर्व मुस्लिम अधिकारी कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील इच्छूक मुस्लिम अधिकारी कर्मचा-यांनाही 'खादीम-उल-हुज्जाज' बनण्याची संधी राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी हज यात्रेकरूंची खिदमत करू इच्छिणा-यांनी अर्ज करणे आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या मुंबई येथील कार्यालयात पोहचेल अशा पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे. 

त्यासाठी मात्र आवश्यक त्या कागदपत्रांची, ना हरकत प्रमाणपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. 'खादीम-उल-हुज्जाज' म्हणून जावू इच्छिणा-या मुस्लिम अधिकारी, कर्मचा-याकडे २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदत असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधिताने यापुर्वी किमान एकदा तरी हज यात्रा केलेली असायला हवी. अर्जामध्ये संपूर्ण वैयक्तिक माहितीसोबतच आपला अधिकृत मोबाईल क्रमांकही नोंदविला पाहीजे. तसेच 'खादीम-उल-हुज्जाज' म्हणून सेवा बजाविण्यासाठी महाराीष्ट्र