ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विशेष मुलांचा सांभाळ करणा-यांना महापालिकेचे अर्थसहाय्य, १२० लाभार्थी पात्र

पिंपरी, दि. ६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मतिमंद अर्थात विशेष मुले, व्यक्तींचा सांभाळ करणा-या व्यक्ती, संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यंदा त्यासाठी १२० लाभार्थी पात्र ठरले असून त्यांना १४ लाख ४० हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत. महापालिका स्थायी समिती सभेमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नि:समर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रातील वर्ष वयापुढील विशेष व्यक्ती, मुलांचा सांभाळ करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, तसेच पालकांना अर्थसहाय्य करण्यात येते. सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या महापालिका सभा ठरावानूसार अशा व्यक्ती अथवा संस्थांना दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची तरतूद होती. 

२० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या महापालिका सभेत यामध्ये दुरूस्ती करण्यात आली असून विशेष व्यक्तींचा सांभाळ करणा-यांना दरमहा दोन हजार रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेल्या लाभार्थी अर्जदारांना दरमहा दोन हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

यंदा ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ या सहा महिन्यांअखेर प्राप्त झालेल्या अर्जदारांपैकी एकूण १२० अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यांना दरमहा दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी बारा हजार रुपये अर्थसहाय्य अदा करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १४ लाख ४० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सन २०१७-१८ च्या वित्तीय वर्षात वर्षापुढील मतिमंद मुले किंवा व्यक्ती सांभाळणा-या अर्थसहाय्य' या उपलेखाशिर्षावर कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून हा १४ लाख ४० हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.