ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला शिवसेना खासदार बारणे यांचा जाहीर पाठिंबा

पिंपरी, दि. ७ - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा आपण लोकसभेत मांडली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासाठी आपण लोकसभेमध्ये सर्वाधिक वेळा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारपुढे मांडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला  आपला जाहीर पाठिंबा आहे, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सांगितले.

खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अनेकदा वाचा फोडली आहे. सभागृहाबाहेर देखील शेतक-यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या शेतकऱ्यांच्या मागण्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे, या मागणीवर शिवसेना ठाम आहे. शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा आणि आपला जाहीर पाठिंबा आहे, असे बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.