ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांचे आंदोलन मागे

पिंपरी, दि. ९ - उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी आज पुन्हा कचरा डेपो येथे आंदोलानाचे अस्त्र उगारल्या नंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी कचरा डेपो येथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. कचरा डेपोसाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांच्या वारसांना तीन महिन्यात नोकरी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

मागील महिनाभरापूर्वी महापालिकेने कचरा डेपो बंद करावा. यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास परवनगी दिली. तर त्यानंतर एक महिन्यात कचराबाबत आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत ग्रामस्थांना देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, महिनाभरात योग्य भूमिका घेतल्यास पुन्हा आंदोलन उभारणार, असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानुसार काल महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराच्या कचरा प्रश्नाचा आराखडा सादर केला. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत नोकरी देण्याचा निर्णय दोन महिन्यात घेण्यात येणार आहे. तसेच कचरा डेपोच्या असलेल्या एकूण १६५ एकर जागेपैकी २५ ते ३० टक्के जागा मोकळी करून ती फुरसुंगी उरुळी देवाची ग्रामस्थांसाठी सार्वजनिक हिताच्या कामांसाठी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वसन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तरी लेखी आश्वसन दिल्याने आज ग्रामस्थांनी कचरा डेपो येथे बैठक आयोजित केली होती. ग्रामस्थांचा पवित्रा लक्षात घेता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करित ग्रामस्थांच्या वारसांना तीन महिन्यात नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थागित केले.