ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतक-यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादीच, भाजप प्रवक्त्या शायना यांचा आरोप

पिंपरी, दि. १० - राज्यातील शेतक-यांनी जून पासून संप सुरु केला आहे. या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादीच असल्याचा, आरोप भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी यांनी आज (शनिवारी) पिंपरीत पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने १५ वर्ष सत्तेत असताना शेतक-यांसाठी काहीच केले नाही. जलसंपदामध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. याउलट भाजपने अडीच वर्षात शेतक-यांसाठी विविध योजना सुरु केल्या असून शेतक-यांचे सर्व प्रश्न सोडविण्याची भाजपची मानसिकता आहे, असेही त्या म्हणाल्या. 

मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त भाजपचे प्रवक्ते विविध शहरामध्ये जावून सरकारने केलेल्या विकासांची माहिती देत आहेत. त्यानिमित्त घेतलेल्या पिंपरीतील पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, ज्येष्ठ नेते वसंत वाणी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. 

शेतक-यांना अनुदान देणे, भाववाढ देणे हे तात्पुरते उपाय आहेत. त्यासाठी कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गेल्या अडीच वर्षापासून राज्य सरकार काम करत आहे. शेतक-यांसाठी जलयुक्त शिवार योजना सुरु केली आहे. कमी पैशाचा वापर करुन पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या योजनेची महाराष्ट्रातील शेतकरी चर्चा करत आहे. महाविद्यालयामध्येही या योजनेबाबत चर्चा होत आहेत, असे सांगत शायना एन. सी म्हणाल्या, प्रत्येक विभागातल दलाल संपविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शेतकरी स्वत:चा माल मुंबई सारख्या ठिकाणी जावून विक्री करत आहे. तसेच शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारने महिला, विद्यार्थी, तरुण, उद्योजक, शेतक-यांसाठी गेल्या तीन वर्षात खूप कार्य केले आहे. महिलांसाठी उज्वला योजना सुरु केली. त्याअंतर्गत