ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सावळे-मुंढे यांच्या वादानंतर पीएमपीएमएलकडून सुधारण्याचे उत्तर

पिंपरी, दि. १२ - विविध मागण्यांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर आता पीएमपी प्रशासनाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बससेवेच्या एकत्रीकरणानंतर या शहरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेपिंपरी- चिंचवड शहरातील वाहतुकीत सुधारणा करण्याचे उत्तर दिले आहे

पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला सक्षम बससेवा पुरविण्यात येत नसल्याचा आरोप करीत काही मार्ग सुरु करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली होती. त्यानंतर मुंढे आणि सावळे यांच्यात वाद झाले होते. 

पुणे विभागातून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या बसची संख्या २९९ आहे. विलीनीकरणापूर्वी पिंपरी-चिंचवडकडे पुणे शहराशी संपर्क ठिकाण हे केवळ पुणे स्टेशनच होते. त्यानंतर बससेवेमध्ये वाढ झाल्यानंतर विश्रांतवाडी, हडपसर, शेवाळवाडी, भेकराईनगर, कात्रज, मार्केटयार्ड, धायरी, कोथरूड डेपो, वारजे-माळवाडी, पुणे मनपा, डेक्कन, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, कोथरूड स्टॅण्ड, हिंजवडी असी सोळा संपर्क ठिकाणे झाली आहेत. दरम्यान, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाले, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला असून पिंपरी-चिंचवड विभागाकडील बस मार्ग सुरु करण्याच्या मागणीच्या अनुषंगानेही मार्गाबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पीएमपीने दिली आहे.