ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कामगारांचा पीएफ न भरणा-या ठेकेदारांना महापालिकेच्या नोटीसा

पिंपरी, दि. १२- पिंपरी-चिंचवड शहरातील क्षेत्रीय हद्दीतील रस्ते, गटर यांची ठेकेदारी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करणा-या स्वयंरोजगार संस्थांनी त्यांच्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमच भरली नसल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रीय कार्यालय हद्दीत स्वच्छतेचा ठेका घेणा-या या स्वयंरोजगार संस्थांना 'पीएफ'ची रक्कम भरल्याबाबतचे पुरावे सात दिवसांच्या आत सादर करावेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा क्षेत्रीय अधिका-यांमार्फत बजावण्यात आल्या आहेत

महापालिका आरोग्य विभागाअंतर्गत रस्ते, गटर यांची दैनंदीन साफसफाई करण्याच्या कामासाठी स्वंयरोजगार सेवांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रती कामगार प्रती महिना किमान वेतन दराने त्यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांसमवेत करारनामा करून त्यांना कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. करारनाम्यातील अटी शर्तीनुसार या संस्थांवर कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम संबंधित संस्थांनी भविष्य निधी कार्यालयात मुदतीत जमा करणे आवश्यक आहे.

 असे असतानाही या संस्थांनी कामगारांची 'पीएफ'ची रक्कम भविष्य निधी कार्यालयाकडे जमा केली नसल्याची तक्रार महापालिकेकडे आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेने संस्थाध्यक्षांना नोटीस बजावल्या आहेत. संबंधित संस्थांनी एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ अखेर त्यांच्या कामगारांची 'पीएफ'ची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केल्याबाबतचे भविष्य निर्वाह चलन, इसीआर फॉर्म, कामगारांचे हजेरी पत्रक असे पुरावे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत कार्यालयाकडे सादर करावेत. या कागदपत्रांची मुदतीत पूर्तता केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.