ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीआरटीएस मार्गावरील अपघात रोखण्याकामी २ कोटींचा खर्च

पिंपरी, १३ - मुंबई- पुणे महामार्गावर बीआरटीएस रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी निगडी ते दापोडी पर्यंतच्या मुख्य चौकातील वाहतुक नियंत्रक दिव्यांच्या प्रणालीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच सर्व बीआरटीएस कॉरिडॉर करिता सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहेत. या दोन्ही वेगवेगळ्या कामांसाठी दोन कोटी खर्च करण्यात येणार आहे. स्थायी समिती समोर हे विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

मुंबई - पुणे महामार्गावर बीआरटीएस रस्त्यावरील मुख्य चौकातील आणि निगडी ते दापोडी पर्यंतच्या वाहतुक नियंत्रक दिव्यांच्या प्रणालीत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व बीआरटीएस कॉरिडॉर करिता सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहेत.  महापालिकेने इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविल्या. बीआरटीएस रस्त्यावरील मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी निविदा दर ६५ लाख रूपये निश्चित करण्यात आला. त्यानुसार, ग्लोबल ट्राफीक सोल्युशन्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा .५०  टक्के कमी दराने निविदा सादर केली. ग्लोबल सोल्युशन्स यांनी सादर केलेली निविदा तुलनात्मकदृष्ट्या योग्य दराची असल्याने त्यांच्यासमवेत करारनामा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

निगडी ते दापोडी पर्यंत सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी निविदा दर कोटी ४० लाख रूपये निश्चित करण्यात आला. त्यानुसार, जे. पी. ट्राफीक ॅटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि न्युक्लॉनिक्स ट्राफीक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन ठेकेदारांनी निविदा सादर केली. जे. पी. ट्राफीक यांनी निविदा दरापेक्षा .२०  टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यांचा दर लघुत्तम असल्याने त्यांची निविदा स्विकारण्यात आली. त्यानुसार, या दोन्ही ठेकेदारांसमवेत करारनामा करून आगामी महापालिका स्थायी समिती सभेपुढे हे दोन्ही विषय मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत.