ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाण्याच्या टाकींवरील वितरण व्यवस्थेसाठी कंत्राटी मजूर पुरविणा-या संस्थेला मुदतवाढ

पिंपरी, दि. १४ - पाण्याच्या टाकींवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविणा-या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. या संस्थेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी १९ लाख ५० हजार रूपये वाढीव खर्चाला मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाचा एकूण खर्च ६५ लाखावंर गेला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाण्याच्या टाकींवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्यात येतात. समीप सर्व्हिसेस या ठेकेदारामार्फेत सध्या मजूर पुरविले जातात. या ठेकेदाराला हे काम निविदा दरापेक्षा .६० टक्के कमी दराने देण्यात आले आहे. या कामाची मुळ मुदत सात महिने होती. सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात मंजूर पुरविण्याच्या नवीन कामास पुरेशी तरतुद नाही. त्यामुळे या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण करता आली नाही.

सन २०१५-१६ या सालाकरिता पाण्याच्या टाकीवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्याच्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम उपलब्ध नव्हते. नवीन कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यासाठी किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी व्हॉल्व ऑपरेशन करण्याकरिता हे जुने काम पुढे सुरू ठेवणे आवश्यक आहे.

या कामाची निविदा ४८ लाख ८१ हजार रूपये इतकी आहे. हे काम सुरू ठेवण्याकरिता वाढीव खर्चाची आवश्यकता आहे. या कामाला महापालिका सभा एप्रिल २०१५ अन्वये ७० लाख रूपये इतकी प्रशासकीय मान्यता आहे. या कामास तीन महिन्यांची मुदतवाढ घेतल्यास वाढीव खर्चाची रक्कम १९ लाख ५४ हजार रूपये इतकी येत आहे. त्यानुसार, एकूण खर्चाची रक्कम ६५ लाख १३ हजार रूपये इतकी होत आहे.