ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्थायी समितीने पीएमपीला पाठवली प्रश्नावली, १५ दिवसांत उत्तर अपेक्षित

पिंपरी, दि. १५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पीएमपीला प्रश्नावली पाठविली आहे. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे पीएमपीएल प्रशासन उत्तर देत नाही. तोपर्यंत पीएमपीला पैसे देण्याची भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. या संदर्भातील विषय येत्या २८ जूनपर्यंत तहकूब ठेवला आहे

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल काढली होती. त्यासाठी शैक्षणिक सहलीचे बील पीएमपीला देण्याचा विषय हा समितीच्या सभेसमोर ठेवला होता. सुमारे सोळा लाख पीएमपीला देण्याचा विषय होता. या संदर्भातील विषय समितीसमोर चर्चेला आल्यानंतर सदस्यांनी पीएमपीकडून पिंपरीला सापत्न वागणूक मिळत आहे.

बैठकीला अधिकार नसलेले अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. याबाबत तक्रारी केल्यानंतर जोपर्यंत पीएमपीचे व्यवस्थापकीय प्रमुख तुकाराम मुंढे सभेस उपस्थित राहून प्रश्न सोडवित नाहीत, तोपर्यंत विषय मंजूर करायचा नाही, अशी भूमिका अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली होती. मात्र, यावरून मुंढे आणि सावळे यांच्यात जुंपली होती. मी बैठकीला येणार नाही, अशी भूमिका मुंढेंनी घेऊन प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. त्यानंतर आज झालेल्या स्थायीच्या सभेत उपमुख्याधिकारी डी. जी. मोरे आणि नितीन घोगरे उपस्थित होते

स्थायी सभेत सदस्यांनी उपस्थित असणा-या अधिका-यांना प्रश्नावली दिली आहे. संचलन तुट कशामुळे, पिंपरीतील रूट का बंद केले याची कारणे, विलीनीकरणापूर्वी कोणाच्या किती बस होत्या. पिंपरीतील वर्कशॉप बंद करण्याचे कारण काय?, पिंपरी-चिंचवड परिसरात महिलांसाठी बस का सुरू केल्या नाहीत, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, संबंधित अधिकारी निरूत्तर झाले आणि सद्या माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर दिल्याचे, सीमा सावळे यांनी सांगितले