ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वायसीएम रुग्णालयातील सारथी हेल्पलाईनवर तक्रार करण्याचा दुरध्वनी बंद

पिंपरी, दि. १५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील 'सारथी' हेल्पलाईनवर तक्रार करण्यासाठी ठेवलेला दुरध्वनी गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांना सोयी-सुविधांबाबतच्या तक्रारी करता येत नाहीत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील नागरिकांच्या तक्रारींसाठी 'सारथी' हेल्पलाईन सुरु केली. नागरिक घरबसल्या आपल्या समस्या, तक्रारी सारथीवर मांडत होते. परंतु, परदेशी यांची बदली झाल्यानंतर आलेल्या एकाही आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिले नाही. सारथींवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. परंतु, प्रशासनाकडून त्याचे निराकरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोयी-सुविधा, तक्रारी करण्याबाबत 'सारथी' हेल्पलाईनवर तक्रार करण्यासाठी एक दुरध्वनी ठेवला होता. रुग्णालयातील रुग्ण आपल्या तक्रारी या दुरध्वनीवरुन 'सारथी'वर करत होते. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून हा दुरध्वनी बंद आहे.

डॉ. श्रीकर परदेशी आयुक्त असताना हा दुरध्वनी ठेवला होता. रुग्ण आपल्या समस्या, तक्रारी या दुरध्वनीवरुन 'सारथी' हेल्पलाईनवर करत होते. त्याचे निराकरण देखील होत होते. परंतु, परदेशी यांची बदली झाल्यानंतर आलेल्या आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिले नाही. गेल्या चार महिन्यापांसून हा दुरध्वनी बंद असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते विकास भुंबे यांनी  बोलताना सांगितले.