ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपने अर्थसंकल्पीय चर्चा गुंडाळली, ४,८०५ कोटींचे बजेट केवळ १८ मिनिटांत मंजूर

पिंपरी, दि. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपने आज (गुरुवारी) अर्थसंकल्पीय चर्चेचा खेळखंडोबा केला. विरोधकांना बोलण्याची कोणतीही संधी देता तब्बल हजार ८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अवघ्या १८ मिनिटांत मंजूर केला. महापालिकेच्या ३५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केल्याचा विक्रम भाजपने नोंदविला आहे. भाजपने दादागिरी केली असून अर्थसंकल्पात नेमके गौडबंगाल काय आहे. महापालिकेसाठी आजचा 'काळा दिवस' असल्याची आक्रमक टीका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने केली आहे. 

महापालिकेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा हजार ८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीने २५ एप्रिल २०१७ रोजी मंजूर केला. त्यानंतर तब्बल ५१ दिवसांनी अर्थसंकल्पाला मंजुरी घेण्यासाठी आज (गुरुवारी) विशेष सभा घेतली आणि १८ मिनिटांत कोणतीही चर्चा करता अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचा विश्व विक्रम करत भाजपने सभा गुंडाळली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याची सूचना मांडली. त्याला भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर काळजे यांनी सेकंदाचाही विलंब करता अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यावर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी कडाडून विरोध केला. साटेलोट्याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे एवढ्या उशिरा अर्थसंकल्प आणला आहे काय? चर्चा करताच अर्थसंकल्पाला मंजुरी कशी दिली जाते? भाजप चुकीची प्रथा पाडत आहे. चुकीच्या पद्धतीने बजेट आणले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, आजचा दिवस पालिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. राष्ट्रवादीचे पाशवी बहुमत असताना अर्थसंकल्पावर १८-१८ तास चर्चा केली गेली आहे. आम्ही कधी दादागिरी केली नाही. भाजपने पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन लोकशाहीचा केसाने गळा कापला आहे. १८ मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर करणे म्हणजे हीच भाजपची पारदर्शकता आहे का? बजेट उशिरा आणण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे. तत्कालीन आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. महापौर निधी कोटीवरून कोटी करून केवळ महापौरांना खूश केले आहे, असेही ते म्हणाले.

मागासवर्गियांसाठी विविध योजना आणल्याचा कांगावा केला जात आहे. परंतु, विरोधात असताना न्यायालयात जाऊन सर्वसामान्य नागरिकांना घरांपासून वंचित ठेवण्याचे काम स्थायी समितीच्या अध्यक्षांनी केले आहे. राष्ट्रवादीच्याच सर्व योजना अर्थसंकल्पामध्ये Posted On: 16 June 2017