ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिकेत विषय मंजुरीनंतर चर्चेची भाजपची नवीन पद्धत

पिंपरी, दि. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तारुढ झालेल्या भाजपने चुकीच्या प्रथा पाडण्याचे काम सुरु केले आहे. विषय मंजूर केल्यानंतर चर्चा करण्याची नवीन प्रथा रुढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, एखाद्या विषयाला मंजुरी दिल्यानंतर त्याच्यावरील चर्चेला काहीच अर्थ राहत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी महिन्याभरापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सभाशास्त्राचे धडे गिरविले आहेत. तरीही नियम, प्रथा पायदळी तुडविल्या जात आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवकांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नेमके कोणते प्रशिक्षण दिले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचे ७७ नगरसेवक निवडून आले आहे. त्यापैकी अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना सभाकामकाजाची जास्त माहिती नाही. याचाच फायदा घेत कामकाजाची माहिती असणारे तीन ते चार नगरसेवक चुकीच्या पद्धतीने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पिंपरी महापालिकेचा हजार ८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प भाजपने केवळ १८ मिनिटांत मंजूर करण्याची 'किमया' केली. पालिकेच्या ३५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. राष्ट्रवादीकडे अनुभवी नगरसेवकांची फौज आहे. त्यांनी अर्थसंकल्पाची 'चिरफाड' केली असती. त्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये म्हणून भाजपने चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांच्याकडे पाशवी बहुमत होते. तरीही, त्यांच्या काळात अर्थसंकल्पावर १८-१८ तास चर्चा झाल्या आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे या विरोधी पक्षात असताना चर्चेसाठी नेहमी आग्रही असत. तास-तासभर त्या भाषणे करीत असत. परंतु, त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर झाला आहे. पुणे महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. त्यांनी दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा केली असताना पिंपरीत नेमकी चर्चा करण्यास काय अडचण होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या स्थापनेला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. मंजुरीच्या Posted On: 17 June 2017