ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोबाईल आणि घरफोडीतील सराईत गुन्हेगारांकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, दि. १७ - पिंपरी येथील आण्णासाहेब मगर जलतरण तलावाच्या ठिकाणी गाडीच्या डिकीत ठेवलेले मोबाईल चोरणा-या पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून तीन लाख ९२ हजार रुपयांचे ५३ मोबाईल जप्त करण्यात आले. तर घऱफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराकडून चार लाख २० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. हि कारवाई क्राईम युनीट चारच्या पथकाने केली असून २३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पिंपरी येथील विठ्ठल नगर झोपड्पट्टीमधून अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलांकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे ५३ मोबाईल असा एकूण लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पिंपरी पोलीस ठाण्यातील १४ तर निगडी एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यातील प्रत्येकी असे एकूण १६ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आण्णासाहेब मगर जलतरण तलाव येथे मागील पाच ते सहा महिन्यांपासून पोहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाडीच्या डिक्कीमधून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत गुन्हे शाखा युनिट ने तलावाजवळ सलग सात ते आठ दिवस पळत ठेऊन ही कारवाई केली. 

दुस-या कारवाईत जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट च्या अधिका-यांनी ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून १४० ग्रॅम वजनाचे तब्बल लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दीपक हनुमंत फुलमाळी (वय ३२, रा. राजीव गांधी झोपडपट्टी गुरव पिंपळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सांगवी पोलीस ठाण्यातील दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.