ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महामेट्रोच्या साईटवर कंटेनरच्या धडकेने दोन सुरक्षा रक्षक जखमी

पिंपरी, दि. १९ - भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे महामेट्रोच्या साईटवरील दोन कर्मचारी जखमी झाले. पुणे-मुंबई महामार्गावरील एक्सप्रेस लेनवर वल्ल्लभनगर येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. विनायक देवेंद्र बडोदिया (२१, रा. पिंपरी) नितीन धनंजय सुरवसे (रा. नेहरूनगर) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. कंटेनरचालक अंकुश शिवाजी म्हस्के याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, दोघा जखमींनी तक्रार द्यायची नसल्याचे सांगितल्यानंतर कंटेनरचालकाला सोडून देण्यात आले.

महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील एक्स्प्रेस लेनपैकी दोन्ही बाजूच्या एकेक लेन लोखंडी कठडे लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहे. त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी या दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

हा अपघात एवढा भयंकर होता की कंटेनरसह दोघेजण काही मीटरपर्यंत फरफटत गेले. अपघातानंतर या ठिकाणी लावण्यात आलेले डायव्हर्जनचे पत्रे, बॅरिकेड्स संपूर्ण रस्त्यात पसरले होते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ते बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रणकक्षाला अपघाताबाबत माहिती समजली. तोपर्यंत तेथे काही नागरिक गोळा झाले होते. निगडीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग भरधाव असल्याने सुरुवातीला वाहनांना थांबविण्याचे काम पोलिसांना करावे लागले. निगडीकडून येताना पिंपरी येथून ग्रेड सेपरेटरमधून पुढे आल्यानंतर नाशिक फाटापर्यंत कोणताही सिग्नल नसल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. तर, नाशिकफाटा कडून पिंपरीकडे जाताना नाशिक फाटा येथे सिग्नल असल्याने वाहनांचा वेग हा तुलनेने कमी असतो.

पिंपरीकडून येताना वल्लभनगरपर्यंत आल्यावर केवळ ५० मीटर अलीकडे वाहनांना वळणाचा (एक लेन बंदचा) फलक दिसतो. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस वाहनांचा वेग जरा जास्तच असल्याने आणि दिवसा कोंडी होऊ नये, म्हणून महामेट्रोकडून दोन्ही लेनवर प्रत्येकी दोन-दोन सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Posted On: 19 June 2017