ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विरोधकांना ड्रेसकोड अमान्य, महापालिकेला खर्चात टाकणार नसल्याची भूमिका

पिंपरी, दि. १९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपने आता सर्वच नगरसेवकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय किती नगरसेवकांना रुचतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, विरोधकांनी या निर्णयावरुन सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

महाराष्ट्रात २६ महापालिका आहेत. यापैकी कुठल्याच महापालिकेत नगरसेवकांना ड्रेसकोड नाही. परंतु, पिंपरी महापालिकेने नगरसेवकांना ड्रेसकोड देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवक सधन कुटुंबातील आहेत. लखपती, करोडपती अशी त्यांची ख्याती आहेदररोज किमती भरझरी उंची वस्त्रे परिधान करणा-या नगरसेवकांना ड्रेसकोड परवडेल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ड्रेसकोडची रंग संगती, पुरुष नगरसेवक, महिला नगरसेविकांसाठी कुठला निकष असणार आहे, हा पेच कायम आहे

महिला अधिका-यांनाही पोशाख देण्याचा आणि क्लास वन अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर 'नेमप्लेट' लावण्याचाही निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. दरम्यान, असा निर्णय झाला नसल्याचा दावा स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यावेळी स्थायी समितीमध्ये ठराव क्रमांक ४६९ झाल्याचे त्यांना दाखविताच त्या 'अवाक' झाल्या होत्या.

याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, महापालिकेला आम्ही खर्चात टाकणार नाहीत. ड्रेसकोड आम्हाला मान्य नाही. पालिका काय शाळा, महाविद्यालय आहे काय?. अधिकारी, कर्मचारी गणवेश परिधान करत नाहीत. भाजपच्या नगरसेवकांनी गणवेश घालावा. त्यांच्या गणवेशाचे पैसे आम्ही देऊ. गणवेश घातल्याने माणसांची प्रवृत्ती बदलत नाही. भाजपने अगोदर आपली प्रवृत्ती बदलावी. लोकशाही मार्गाने कामकाज करावे. तीन ते चार नगरसेवकच महापालिका चालवत आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना गणवेश घालून शाळेत पाठविणे गरजेचे असल्याचा, टोलाही बहल यांनी लगावला.

शिवसेनेचे शहरप्रमुख