ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरीचे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये जोरदार खडाजंगी

पिंपरी, दि. २१ - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सभाशास्त्र आणि महापौरांची नवीन मोटार खरेदी या विषयावरुन 'वाद' विकोपाला गेल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.२०) पार पडली. महापौर नितीन काळजे यांच्यासह पदाधिकारी आपल्या कार्यालयात गेले. त्यानंतर सभाशास्त्र आणि महापौरांच्या नवीन मोटार खरेदीवरुन महापौर काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती, अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पिंपरी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर संख्याबळानुसार १३ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य निवडीवरुन सकाळपासूनच भाजपमध्ये खदखद सुरु होती. भोसरीतील नगरसेविका प्रियंका बारसे यांची समितीवर नियुक्ती करण्यास एका गटाने विरोध केला होता, असे सूत्रांनी सांगितले.

परंतु, दुस-या गटाने बारसे यांचे नाव लावून धरत त्यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर वर्णी लावली. त्यामुळे भाजपचा एक गट कमालीचा नाराज झाला होता. त्यातून आणि महापौरांच्या नवीन मोटार खरेदीवरुनच महापौर काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेतील भाजप पदाधिका-यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाल्याची स्थिती आहे. महापौर काळजे आणि सभागृह नेते एकनाथ पवार हे दोघे एकत्र तर स्थायी समिती अध्यक्ष सावळे स्वतंत्र कामकाज करत असल्याचे पालिकेत चित्र आहे. कचरा विलिनीकरण मोहिमेच्या पत्रकार परिषदेला कार्यालयात असतानाही सावळे यांनी येणे टाळले होते. त्यावेळी निमंत्रण दिल्याच कारण पुढे करत सभागृह नेत्यांनी अधिका-यांनाच फैलावर घेतले होते.

पिंपरी पालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपले कट्टर समर्थक नितीन काळजे यांनी महापौरपदी विराजमान केले. महापौर निवडीवरुन भाजपमध्ये संघर्ष उफळा होता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक अशी Posted On: 21 June 2017