ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपकडून उधळपट्टी सुरू, व्हिजीटींग कार्ड, लेटरहेडसाठी १५ लाख रूपये खर्च

पिंपरी, दि. २१ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्ताधीश झालेल्या भाजपकडून पैशाची उधळपट्टी सुरू झाली आहे. पदाधिका-यांसाठी व्हिजींटीग कार्ड, लेटरहेड, शिफारस पत्र यावर तब्बल १५ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. तीन ठेकेदारांकडून हे वेगवेगळे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उधळवून भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपने पैशाची नाहक उधळपट्टी थांबविणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेत येऊन काही महिने उलटत नाहीत तोच भाजपनेही आता राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल ठेवून उधळपट्टी सुरू केली आहे

महापालिकेतील पदाधिकारी आणि विविध विभागांसाठी निमंत्रण पत्रिका, व्हिजीटींग कार्डस, लेटरहेड, शिफारसपत्र आणि पाकीटे छपाई खरेदी करण्यात येणार आहे. हे छपाई साहित्य खरेदीसाठी इच्छूक ठेकेदांराकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये आकुर्डीतील गणराज प्रिंटर्स यांनी सात प्रकारच्या साहित्यासाठी १२ लाख १७ हजार रूपये, चिंचवड येथील आशिष एंटरप्रायजेस यांनी एका साहित्यासाठी लाख ८० हजार रूपये आणि पुण्यातील जयगणेश ऑफसेट यांनी चार प्रकारच्या साहित्यासाठी लाख ७१ हजार रूपये लघुत्तम दर सादर केला

या तीनही ठेकेदारांचे दर इतर ठेकेदारांपेक्षा कमी असल्याने त्याच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव महापालिका स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.