ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी अन्यथा काम बंद, नगरसेवकांची भूमिका

पिंपरी, दि. २१ - दर्जेदार वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पाची आवश्यकता आहे. परुंतु मेट्रो निगडीपर्यंत असावी. अन्यथा मेट्रोला काही अर्थ राहणार नाही. पुणे महामेट्रोने पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत मेट्रो न्यावी, अन्यथा काम होऊ देणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. तसेच मेट्रोचे नाव पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत नगरसेवकांसाठी पुन्हा मेट्रो संवादचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना मेट्रो प्रकल्पाची माहिती व्हावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी मंगळवारी (दि.२१) ‘मेट्रो संवादचे आयोजन करण्यात आले होते. महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे मेट्रोचे प्रकाश कदम, श्रीनिवास कुलकर्णी या बरोबर पिंपरी- चिंचवड महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.
मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांनी माहिती दिली. मेट्रोने छापलेल्या पुस्तकावर पुणे मेट्रो असा उल्लेख केला आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड मेट्रो असा उल्लेख का? केला नाही, असा प्रश्न उपस्थित करत माजी महापौर नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, पुस्तकावर पिंपरी-चिंचवडचा उल्लेख असणे गरजेचे आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे मेट्रोचे नाव करण्याची मागणी त्यांनी केली.

मेट्रो गहुंजेपर्यंत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. गहुंजे येथे किक्रेटचे मैदान आहे. गहुंजेपर्यंत मेट्रो केली असती तर त्याचा पुण्यातील नागरिकांना देखील फायदा झाला असता. परंतु, पहिल्या टप्यात पिंपरीपर्यंतच मेट्रो करण्यात येणार आहे. निगडीतील भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रो असल्याशिवाय