ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेनेच्या निर्णयात भाजपने हस्तक्षेप करू नये - राहुल कलाटे

पिंपरी, दि. २२ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य आणि स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) या कंपनी संचालक पदावर शिवसेने दिलेल्या अधिकृत नावांऐवजी परस्पर दुस-याच नगरसेवकांची नेमणूक केल्याचा गंभीर आरोप, शिवसेनेचे शहरप्रमुख पालिकेतील गटनेते  राहुल कलाटे यांनी केला आहे. भाजपने शिवसेना नगरसेवकांची नावे कोणाला विचारून घेतली आहेत. शिवसेनेच्या निर्णयात हस्तक्षेप करून भाजप दादागिरी करत असून शिवसेनेत फूट पाडण्याचे घाणेरडे राजकारण करीत आहे, असाही आरोप कलाटे यांनी केला आहे.

याबाबत कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्यातील सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.२०) पार पडली. या सभेत वृक्ष प्राधिकरण समितीवर आणि स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) या कंपनीवर सदस्य निवडण्यात आले. शिवसेनेचा गटनेता म्हणून आमच्या संख्याबळानुसार निवड करण्यात    येणा-या नगरसेवकांची नावे असणारा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांची सही असलेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षादेश असणारे पत्र आपण आयुक्त श्रावण हर्डीकर महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले होते. त्यात स्मार्ट सिटी संचालकपदासाठी राहुल कलाटे यांचे तर वृक्ष प्राधिकरण समितीसाठी अश्विनी चिंचवडे यांची निवड करण्याची स्पष्ट सूचना आहे.

प्रत्यक्षात मात्र महापौर नितीन काळजे यांनी त्यापेक्षा वेगळ्याच नगरसेवकांची नेमणूक जाहीर केली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही'वर संचालक म्हणून नगरसेवक प्रमोद कुटे यांची आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर अॅड. सचिन भोसले यांची नियुक्ती केली. या दोन्ही नावाला पक्षाचा शहरप्रमुख पालिकेतील गटनेता म्हणून माझा कसलाही विरोध नाही. परंतु, कोणत्याही समितीवर सदस्यांची निवड करताना संख्याबळानुसार निवड केली जाते. प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या पक्षांची नावे महापौरांकडे