ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजकीय नेत्यांच्या संस्थांना पालिकेतर्फे देण्यात आलेल्या अनुदानाची चौकशी होणार

पिंपरी, दि. २२ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संस्थांना अनुदान दिल्याचे उघड झाले आहे. राजकीय नेत्यांच्या एकाच संस्थेला वर्षानुवर्षे अनुदान कसे दिले? याची चौकशी करावी. ऑडिट रिपोर्ट देणा-या संबंधित संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विलास मडेगिरी यांनी केली. त्यावर महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनास खुलासा करण्यास सांगितले. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत

भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी महापालिकेने आजपर्यंत शहरातील विविध संस्थांना दिलेल्या अनुदानाचे प्रश्न विचारले होते. त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या उत्तरांचा अभ्यास करून महापालिकेच्या स्थापनेपासून किती संस्थांना अनुदान दिले. त्याची रक्कम किती होती. निकषांचे पालन झाले की नाही, कोणत्या संस्थांना वारंवार अनुदान दिले, याचा आढावा घेतला

यावर बोलताना विलास मडेगिरी म्हणाले, अनुदानाविषयी प्रशासनाकडून माहिती मागविली असताना त्यात प्रशासनाने पूर्णपणे माहिती दिलेली नाही. काही वर्षांची माहिती दिली. उर्वरित माहिती पुढील सर्वसाधारण सभेपर्यंत मिळावी. तसेच तीन लाखांपेक्षा अधिक अनुदान देताना शासनाची मंजुरी घ्यावी लागते. अनेकांना अनुदान देताना वर्षानुवर्षे ही मंजुरी घेतली नाही. यात दोष कोणाचा? सुरुवातीला आठ वर्षे अनुदान दिले नाही. त्यानंतरच्या कालखंडात निधी ज्या संस्थांना दिला, त्यात अनियमितता दिसून येते

महापालिकेने निधी दिल्यानंतर शासनाची मंजुरी घेतलेली नाही. आजपर्यंत सुमारे नऊ कोटींचा निधी विविध सामाजिक संस्थांना दिला आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवक असणा-या साई संस्कार संस्थेला, शिवसेनेच्या माजी नगरसेविका यांच्या संस्थेला, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी असणा-या गांधी पेठ तालीम, माजी उपमहापौर आणि विधी समितीचे सभापती, माजी स्थायी समितीचे सभापती असणा-या एका संस्थेला वारंवार अनुदान दिले आहे, असे मडिगेरी म्हणाले

अनुदान देताना त्याचा विनियोग व्हावा, या संदर्भात अवलोकन केलेले नाही. प्रशासनाने होऊन काहीही केलेले नाही. नगरसेवकांच्या अनेक संस्था असल्याचे उघड झाले