ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा विनयभंग, भाजप कार्यकर्त्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी, दि. २३ - राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविकेचा विनयभंग करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यासह दोघांविरुद्ध र्पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यद्वारासमोरील वाहनतळात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. 

कुणाल लांडगे आणि सतीश लांडगे (रा. कासारवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. कुणाल लांडगे याने भाजपच्या चिन्हावर संत तुकारामनगरमधून निवडणूक लढवली होती. शिवीगाळ करत विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. लांडगे यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केला असून बदनामीसाठी जाणीवपूर्वक खोटी फिर्याद दिल्याचा दावा केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.