ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपमध्ये गटबाजी, ग्रेडसेपरेटर उद्घाटनावर आमदार जगताप गटाचा बहिष्कार

पिंपरी, दि. २३ - पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताकारणात भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्यात वर्चस्ववादाची सुरु झाली आहे. त्याचे पडसाद आज (शुक्रवारी) केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर कार्यक्रमाच्या उद्घाटनात उमटले. महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे यांनी तासभर प्रतिक्षा करुनही जगताप गटाचे कोणीही कार्यक्रमाला फिरकले नाही. त्यामुळे अखेरीस महापौर काळजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याची सारवा-सारव भाजपकडून करण्यात आली.  

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात, ड्रेसकोड, सभाशास्त्र, महापौरांसाठी नवीन मोटारीची खरेदी, विषय समिती सदस्य नियुक्त्या या विविध कारणांवरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु झाला आहे. त्याचे पडसाद महापालिका राजकारणात उमटत आहे. त्याची परिणीती दोन दिवसांपुर्वीच महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्या खडाजंगीमध्ये झाली होती. या दोन सत्ताकेंद्रामध्ये 'वर्चस्व' वादाची लढाई सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक २३ नगरसेवकांची मोशीत स्वतंत्र बैठक घेत वेगळी चूल मांडली. या बैठकीत आमदार लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना आक्रमक होऊन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बैठक घेऊन आमदार लक्ष्मण जगताप गटाला आव्हान निर्माण केले. भविष्यात हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक ग्रेड सेपरेटर उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिसली.

महापौर नितीन काळजे यांनी केएसबी चौक येथे बांधलेल्या पुलाच्या उजव्या बाजूकडील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन कार्यक्रमाचे आज (शुक्रवारी) आयोजन केले होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. परंतु, अपरिहार्य कारणास्तव बापट उपस्थित राहू शकले नाहीत. 

महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे तसेच नगरसेवकांनी सुमारे तासभर आमदार लक्ष्मण जगताप यांची वाट पाहिली. सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे किमान हे तरी कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमदार जगतापांसह, पवार, सावळे यांनीही कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महापौर काळजे यांच्या हस्ते उद्घाटन उरकण्यात आले.  

दरम्यान, जगताप गटाच्या अनुउपस्थितीबाबत महापौर नितीन काळजे यांना विचारले असता, उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी ठरला होता. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे काही पदाधिकारी येऊ शकले नाहीत. सभागृह नेते एकनाथ पवार यांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते पंढरपुरला असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आमच्यात कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे सांगत त्यांनी सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. 

खासदार साबळे म्हणाले, भाजपमध्ये कसलीही गटबाजी नाही. सगळ्यांनी एक दिलाने काम केल्यामुळेच<