ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिकेतर्फे देण्यात येणारे शाहू पुरस्कार बंद

पिंपरी, दि. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तब्बल अकरा वर्षांपासून देण्यात येणारा 'राजर्षि शाहू पुरस्कार' सत्ताधा-यांनी बंद केला आहे. तसेच लहान मुले, महिलांसाठी घेण्यात येणा-या विविध स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव समारंभही यंदापासून थांबविण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूरवासियांनी नाराजी व्यक्त करत पालिकेचा निषेध केला आहे.

लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी साजरी करण्यात येत असे. कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या एका कोल्हापूरवासियाला दरवर्षी शाहूंच्या नावाचा पुरस्कारही दिला जात असे. तत्कालीन महापौर प्रकाश रेवाळे यांनी, आपल्या कारकिर्दीत दोन-दोन संस्था किंवा वेगळ्या ठिकाणी जयंती साजरी करण्यापेक्षा महापालिकेतर्फे साजरी करण्याचे आवाहन कोल्हापूरवासियांना केले होते. त्यानंतर मंगला कदम महापौर असताना सन २००५ पासून कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी होवू लागली.

'राजर्षि शाहू पुरस्कार' म्हणून महापालिकेतर्फे चांदीचा रथ, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून पुरस्कार्थीला गौरविण्यात येत असे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील दहा महिला दहा पुरूष यांचाही गौरव प्रोत्साहनपर पुरस्काराने केला जात असे. त्यासाठी महापालिकेला सरासरी पाच ते सात लाख रुपये खर्च येत असे. तब्बल अकरा वर्षे सुरू असलेला हा 'राजर्षि शाहू पुरस्कार' अचानक यंदापासून बंद करण्यात आला आहे.

प्रोत्साहनपर देण्यात येणारे पुरस्कार, लहान मुले, महिलांसाठी घेण्यात येणा-या विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमही थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरवासिय, तसेच शाहूप्रेमी नाराज झाले आहेत.

याबाबत बोलताना माजी महापौर विद्यमान नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, शाहू जयंती साजरी करण्यासाठी महापौर नितीन काळजे यांनी कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाच्या पदाधिका-यांना चर्चेसाठी बोलावले. त्यावेळी झालेल्या बैठकीमध्ये जयंती जोरात करायची, कुठले कार्यक्रम घ्यायचे, कुणाला पुरस्कार द्यायचा, कोणत्या स्पर्धा Posted On: 27 June 2017